Invalid Clicks पासून वाचवा आपले Adsense अकाउंट ...!

     आपल्यापैकी बहुतेक नवीन ब्लॉगर्स हे त्यांचा ब्लॉग किंवा वेबसाईट ब्लॉगर प्लॅटफॉर्म वरच चालवतात कारण ब्लॉगर हे वापरायला सोपे आणि कमी खर्चिक आहे परंतु या प्लॅटफॉर्म वरील सगळ्यात मोठी डोकेदुखी आहे ती म्हणजे अवैध क्लीकद्वारे (invalid clicks) आपले अडसेन्स अकाउंट बंद पडणे. तर या invalid clicks पासून आपण आपले अडसेन्स अकाउंट कसे वाचवू शकतो हे बघूया..!



सर्वप्रथम आपण हे बघू की आपल्या वेबसाईट एड्स वर invalid clicks कसे होतात ?

१) दिशाभूल करणारे कंटेंट :-
जर तुम्ही चुकीची माहिती असलेले किंवा जास्त ट्रॅफिक मिळवण्यासाठी फसवे कंटेंट वेबसाईटवर प्रकाशित केले असेल तर भरपूर वेळा साईट ला भेट देणारे चिडल्यामुळे मुद्दामहून जाहिरातीवर जास्त वेळा क्लीक करतात जेणेकरून अकाऊंट बंद होईल.
२) खूप सारे एड्स:-
एड्स ची संख्या जास्त असल्यास भेट देणाऱ्याकडून चुकून वारंवार जाहिरातीवर क्लिक केले जाते व गुगल याला invalid click म्हणून गृहीत धरते. Auto ads मुळे हा प्रॉब्लेम आणखी वाढतो.
तसेच आपल्या कडून सुद्धा कधीही ऍड क्लीक होणार नाही याचीही काळजी घ्यावी.
३) शत्रू :-
दुसऱ्याची होत असलेली प्रगती काही लोकांना सहन होत नाही त्यामुळे ते त्याच्या प्रगतीत अडथळे आणन्यासाठी एखाद्याच्या वेबसाईटवर जाऊन मुद्दाम एड क्लिक करतात म्हणून आपल्या वेबसाईट ची लिंक सहजासहजी कोणाला देऊ नका. असे लोक शक्यतो ओळखीतीलच असतात.

आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एडसेन्स अकाउंट मिळवण्यासाठी आपल्याला किती मेहनत करावी लागते काही वेळा महिनोनमहिने थांबून देखील एडसेन्स अप्रुवल मिळत नाही. त्यामुळे ज्याने हे सगळं बघितलंय त्यालाच ऍडसेन्स बंद पडल्यावर किती त्रास होतो हे कळतं. परंतु आता घाबरण्याचं काहीही कारण नाहीये खालील प्लगीन द्वारे तुम्ही तुमच्या एड्स वरील invalid clicks १०० टक्के रोखू शकता आणि पर्यायाने तुमचे ऍडसेन्स अकाउंट disable होण्यापासून वाचवू शकता...!

१)डिफॉल्ट कोड

<script type='text/javascript'>
//<![CDATA[
function downloadJSAtOnload(){var e=document.createElement("script");e.src="https://rawcdn.githack.com/mhdfasilwyd/script/e10713efcec5a681123c8cc8b74312cd4441b065/adsense-guard.js",document.body.appendChild(e)}window.addEventListener?window.addEventListener("load",downloadJSAtOnload,!1):window.attachEvent?window.attachEvent("onload",downloadJSAtOnload):window.onload=downloadJSAtOnload;
//]]>
</script>




हा कोड आपल्याला ब्लॉगर च्या html editor मध्ये जाऊन </head> किंवा </body> च्या वर पेस्ट करायचा आहे .


खालील चित्राद्वारे आपल्याला आणखी चांगल्या पद्धतीने कळेल.
                   कोड पेस्ट करण्याअगोदर 

कोड पेस्ट केल्यांनंतर 





ह्या कोड चे कार्य एकदम सोपे आहे एखादा यूजर जर जाणून बुजून एका पेक्षा जास्त वेळा एड्स क्लीक करत असेल तर ते ओळखून हा कोड त्या यूजर ला एक विशिष्ट वेळे पर्यंत एड्स दाखवायचे बंद करते आणि त्यामुळे तुमचे अकाउंट बंद होण्याच्या धोक्यापासून सुरक्षित राहते .नेहमी चांगले आणि दुसऱ्यांना मदत होईल असे कंटेंट बनवा त्यामुळे तुमचा युसर वेबसाईटवर विश्वास ठेवून त्याच्याशी नेहमीसाठी जोडला जाइल तसेच जास्त कमाईच्या नादात ऍडसेन्स साठी कोणतीही ट्रिक वापरू नका लक्षात ठेवा गुगल अपल्यापेक्षा जास्त स्मार्ट आहे त्याला आपण फसवू शकत नाही...!
जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ओळखीच्या लोकांसोबत याला जास्तीत जास्त शेयर करा..!
धन्यवाद..!

टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या